Home
HomeBreaking Newsभोलूभाऊ सोमनानी मित्रपरिवार वैरागड येथील तरुणांचा पुढाकार..

भोलूभाऊ सोमनानी मित्रपरिवार वैरागड येथील तरुणांचा पुढाकार..

शितलताई सोमनानी यांनी केले कीर्तिवंत, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..

आरमोरी / वैरागड :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती चे औचित्य साधून भोलूभाऊ सोमनानी मित्रपरिवाराच्या वतीने नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर वैरागड येथील दीपिका सुधाकर लांजेवार, जानवी विलास भैसारे तसेच लगतच्या सुकाळा येथील ज्ञानेश्वरी गजानन गुरनुले व तृप्ती शत्रुघ्न मोहुर्ले यांनी पोलीस भरती परीक्षा उत्तीर्ण करून पोलीस विभागात नोकरी मिळवली. त्यांच्या या यशाबद्दल सामाजिक कार्यकर्त्या शितलताई सोमनानी यांच्याकडून पोलिस भरतीत यशस्वी झालेल्या सर्वांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि संविधानाची उद्देशिका देऊन त्यांचे गौरव करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य केशवराव गेडाम, वैरागडच्या माजी सरपंच संगीताताई पेंदाम, कोजबी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच वैशालीताई डोंगरवार, ग्रामपंचायत सदस्य आदेश आकरे, प्रतिभाताई बनकर, संगीताताई मेश्राम, शितलताई सोमनानी, रुचित बोधनकर तसेच बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments