Home
HomeBreaking Newsसामाजिक कार्यकर्ते भोलूभाऊ सोमनानी यांच्या "मातोश्री" कमलाबाई सोमनानी अनंतात विलीन ; शोकाकुल...

सामाजिक कार्यकर्ते भोलूभाऊ सोमनानी यांच्या “मातोश्री” कमलाबाई सोमनानी अनंतात विलीन ; शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार, अंत्यविधीत फार मोठा जनसमुदाय.. आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांची उपस्थिती ; पार्थिवाचे घेतले अंतिम दर्शन

आरमोरी:- तालुक्यातील वैरागड येथील बलराम सोमनानी (भोलूभाऊ) यांच्या मातोश्री कमलाबाई सोमनानी यांचे 20 मे रोजी वृद्धापकाळाने नागपूर येथील एका खाजगी इस्पितळात प्राणज्योत मावळली. गुरुवार 21 मे रोजी कमलाबाई सोमनानी अनंतात विलीन झाले असून वैरागड येथील वेलोचना नदीघाटावर रितीरिवाज व परंपरेनुसार विधी करून मोठ्या जनसमुदायाच्या साक्षीने शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी अचानक घडलेल्या दुःखद घटनेमुळे अहेरी येथील नियोजित कार्यक्रम रद्द करून वैरागड येथे तात्काळ धाव घेऊन कमलाबाई सोमनानी यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले व सोमनानी परिवाराचे सांत्वन केले.कमलाबाई सोमनानी यांचे शांत, प्रेमळ, मनमिळाऊ स्वभावामुळे आणि गोरगरिबांना नेहमी मदतीच्या वृत्तीमुळे व भोलूभाऊ सोमनानी यांच्या लोकप्रियतेमुळे विविध क्षेत्रातील व नामवंत मंडळी हळहळ व्यक्त करून अंत्य विधीत मोठ्या संख्येने सामील झाले होते. कमलाबाई सोमानानी यांच्या पश्चात चार मुले, चार मुली, सुना, नातवंडे आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments