Home
Home Breaking News महाशिवरात्री यात्रेसाठी तब्बल ७४ बसेस धावणार

महाशिवरात्री यात्रेसाठी तब्बल ७४ बसेस धावणार

0
41

२४ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत राहणार बससेवा उपलब्ध

गडचिरोली : येत्या बुधवार २६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या महाशिवरात्री यात्रेत जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित व सुरळीत प्रवासासाठी राज्य परीवहन महामंडळाव्या गडचिरोली विभागातून तब्बल ७४ बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या बसफेऱ्या २४ फेब्रुवारीपासूनच सुरू होणार असून २ मार्च पर्यंत बससेवा उपलब्ध राहणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देव येथील यात्रेसह
चपराळा, व्यंकटापूर, कालेश्वर, वैरागड व अन्य ठिकाणी महाशिवरात्री यात्रा भरत असते. जिल्ह्यात वामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देव येथे मुख्य यात्रा भरते. या ठिकाणी यात्रा कालावधी दरम्यान जवळपास ३ ते ४ लाख भाविक मार्कंडेश्वराच्या दर्शनासाठी येत्त असतात. या भाविकांचा यात्रास्थळापर्यंतचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून राज्य परीवहन महामंडळाच्या गडचिरोली विभागाव्यावतीने पुरेशा प्रमाणात बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
गडचिरोली आगारातून मार्कंडा देव यात्रेसाठी एकंदरीत २३ बसेस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये गडचिरोली ते मार्केडा १५ बसेस, चामोर्शी ते
अरततोडी,
मार्कंडा १५ बसेस, सावली ते साखरीघाट १ बस, व्याहाड खुर्द ते साखरी घाट मार्गे१ बस सोडण्यात येणार आहे.
अहेरी आगारातून एकंदरीत १५ बसेस सोडण्यात येणार
या ठिकाणी राहणार यात्रा केंद्र
यात्रा काळात सुरळीत व्यवस्थापनासाठी यात्रा केंद्र निश्चीत करण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. निश्चित करण्यात आलेल्या यात्रा केंद्रात गडचिरोली आगार, सावली, आष्टा, चपराळा, चामोर्शी, चामोर्शी रोड गडचिरोली, मूल या केंद्रांचा समावेश आहे. या ठिकाणी जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
मार्कंडेश्वर यात्रेच्या माध्यमातून ४५लाख रूपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा
गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख महाशिवरात्री यात्रा असलेल्या मार्कंडेश्वर यात्रेच्या माध्यमातून : गडचिरोली विभागाने ४५ लाख १९ हजार २७० रूपयांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. २०२४ च्या मार्कडादेव यात्रेच्च्या माध्यमातून गडचिरोली विभागास १९ लाख ८९ हजार८२४ रूपयांचे उत्पन्न: झाले होते.
आहेत. यामध्ये आष्टी ते चपराळा
५ बसेस, चपराळा आष्टी मार्कंडादेव १० बसेस, अहेरी ते व्यंकटापूर २ बसेस आणि अहेरी ते कालेश्वर २ बसेस सोडण्यात येणार आहेत. रापमच्या ब्रम्हपुरी
आगारातून एकंदरीत २२ बसेस सोडण्यात येणार आहेत.
यामध्ये मुल ते मार्कंडा मार्गावर२० बसेस व ब्रम्हपूरी ते अरततोंडी मार्गावर २ बसेस सोडण्यात येणार आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here