Home
HomeBreaking Newsसिमूनतला येथील अवैद्य मुरूम उत्खनन प्रकरण ; महसूल विभाग व वन विभाग...

सिमूनतला येथील अवैद्य मुरूम उत्खनन प्रकरण ; महसूल विभाग व वन विभाग यांचाच ठेकेदाराच्या डोक्यावर हात नसावा?

“मुरुम रॉयल्टी 100 ते 200 ब्रासची खड्डा मात्र 1000 ब्रासचा”..

सिमूनतला, शमनगर, नेताजी नगर, घोट, पेटतळा, मंजेगाव, ठाकूर नगर, येथील ग्रामस्थांची संबंधित ठेकेदाराची चौकशी करून कारवाहीची मागणी..

घोट :- चामोर्शी तालुक्यातील घोट जवळील सिमुनतला येथील महादेव मंदिराजवळ असलेल्या मुरूम खदानाची हजारो ब्रास अवैद्य उत्खनन करून संबंधित ठेकेदाराने (मुरुम)मालवाहतूक केला असून संबंधित ठेकेदारावर योग्य चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी घोट परिसरातील जवळच असलेल्या सिमुनतला, शमनगर, नेताजी नगर, घोट, पेटतळा, मंजेगाव, ठाकूर नगर
या गावातील ग्रामस्थांनी सदर मागणी केलेली आहे.

सदर गावातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित ठेकेदाराला मुरुम खदानची रॉयल्टी 100 ते 200 ब्रास असताना सुद्धा 1000 ( हजार ) ब्रासची खड्डे पडले आहेत.
शंभर ते दोनशे ब्रास पर्यंत रॉयल्टी असताना हजारो ब्रासचे अवैध मुरुम उत्खनन कसे काय केले अशी विचारणा सुद्धा गावकऱ्यांनी वन विभाग व महसूल विभागाला केली आहे.
कदाचित शासनाच्या वन विभाग किंवा महसूल विभाग यांच्याकडूनच तर ठेकेदाराच्या डोक्यावर हात नसावा असा संशय व्यक्त केल्या जात आहे..

अशा अवैद्य मुरूम उत्खननामुळे “शासनाचा कर “बुडालेला आहे. वन विभागाचे आणि महसूल विभागाचे मोठे नुकसान तर होतच आहे. परंतु
या घोट, (सिमुनतला) परिसरातील सिमुनतला येथील महादेव मंदिराजवळ असलेल्या मुरूम खदानीला सबंधित ठेकेदाराने गिळंकृत केल्याचे दिसून येत आहे. याच कारणामुळे या परिसरातील गावकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.

संबंधित ठेकेदाराची योग्य चौकशी करून कारवाई न झाल्यास संबंधित गावकऱ्यांच्या वतीने आंदोलन करून मुरूमाचे उत्खनन बंद करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments