Home
HomeBreaking Newsएटापल्ली तालुक्यातील तुमरगुंडा गावाजवळ चहाच्या दुकान जवळ मोटार सायकलचा अपघात..

एटापल्ली तालुक्यातील तुमरगुंडा गावाजवळ चहाच्या दुकान जवळ मोटार सायकलचा अपघात..

तीन जन जखमी ; एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती..

गस्त पथकाची तत्काळ मदत..

एटापल्ली :- दिनांक २२-०२-२६ रोजी दुपारी १२:०० वाजता, नोंदणी क्रमांक MH-33-AG-3402 असलेली एक मोटारसायकल, जी (ट्रिपल सीट)तीन नागरिकांना घेऊन जात असताना तुमरगुंडा गावाहून परसलगोंदी गावाकडे जात होती, त्यानंतर गाडी रस्त्यावर घसरली. परिणामी, सर्वजण मोटारसायकलवरून पडले आणि जखमी झाले. जखमींना तत्काळ मदत करण्यात आली.आणि जखमींना दवाखान्यात भरती करण्यात आले.
जखमींना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी पेट्रोलिंग वाहनाने तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले.

गस्त पथकाची तत्काळ मदतीची कार्यवाही–
गस्त पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आवश्यक ती मदत केली. जखमींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि एका मुलीला वैद्यकीय तपासणी आणि उपचारांसाठी एटापल्ली रुग्णालयात दाखल करण्यात आले. आणि एका मुलाला आणि मुलीला हेडरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वाहनस्वारांची माहिती—
१. बन्नी दुर्वा (जखमी) परसलगोंदी
२. मिस करिश्मा दुर्वा आधार नुसार मीना दुर्वा (जखमी) परसलगोंदी
३. रूपेश गावडे गुंडापूर गावातील असून सदर सर्व जखमींना प्रथमोपचारा नंतर पुढील उपचारांसाठी चंद्रपूर येथे पाठवण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार एक जण मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments