गडचिरोली : राज्य परिवहन
महामंडळ खाजगी ट्रॅव्हल्सच्या स्पर्धेत कोसो दूर आहे. आधीच तिकीट दरात प्रचंड भाडेवाढ केल्याने प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरविली आहे. त्यात कंडम गाड्या रस्त्यावर जुन्या मोडकळीस आलेल्या बसेसच्या दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च करत आहेत. धूर ओकत धावणाऱ्या बसेस प्रदुषणात भर घालतीत आहेत. शिववाय कुठे, कधी बंद पडतील याचा काही नेम नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगारातून दररोज अनेक बस गाड्या धावतात. लांबपल्ल्याच्या गाड्यांना देखील
चांगला प्रतिसाद आहे. जिल्हातंर्गत धावणाऱ्या बहुतांश गाड्यांची अवस्था बिकट आहे. यामुळे अनेक बसेस रस्त्यावर बंद पडण्याच्या घटना घडत आहे. या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेस खिळखिळ्या आणि खिडक्या तावदाने तुटलेल्या आहेत. काही
बसेस मधील सीटचे कुशनही फाटलेले असते. पावसाळ्यात वसाळ्यात टपातून पाणी गळती सुरुच असते.
त्यात अस्वच्छता सर्वत्र पसरलेली आणि तंबाखु, गुटख्याच्या कबट वासाने प्रवास नकोसा होतो. मात्र तरीही ग्रामीण भागातील प्रवाशी एसटी बसने
प्रवास करण्यास पसंती देतात. बसचा प्रवास सुरक्षित समजला जातो. मात्र आता तो सुरक्षित राहीला नाही. मोडकळीस आणि कालबाह्य होऊ पाहणाऱ्या बस गडचिरोली व अहेरी आगारातून धावतात.
महामंडळ बसगाड्या दुरुस्तीवर कोट्यावधींचा खर्च करत असते. मात्र, कायमस्वरुपी तोडगा काढत नाही. नादुरुस्त गाड्या घेऊन जाण्यास चालकही तयार नसतात. मात्र, कर्तव्य म्हणून जावेच लागते. रस्त्यात बस बंद पडल्यास प्रवाशांचा रोष चालक, वाहांनाच सहन करावा लागतो.




