Home
Home Breaking News चिचडोह बॅरेजचे पाणी न सोडल्याने 150 एकर शेतीतील पीक संकटात.

चिचडोह बॅरेजचे पाणी न सोडल्याने 150 एकर शेतीतील पीक संकटात.

0
51
Oplus_131072

पाण्याची पातळी वाढविण्याची शेतकऱ्यांची मागणी

कुनघाडा रै: येथील वैनगंगा नदीच्या काठावरील शेतशिवारात अनेक शेतकऱ्यांनी दुहेरी पीक घेण्यासाठी धानपिकाची तसेच भाजीपाल्याची लागवड केली आहे. मात्र वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी फारच कमी झाल्यामुळे पाण्याभावी १५० एकर शेतीतील धान व भाजीपाला पीक धोक्यात सापडले आहे. नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ करण्यासाठी चिचडोह बॅरेजच्या पाण्याची पातळी तात्काळ वाढवावी अशी मागणी कुनघाडा रै. येथील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता यांना निवेदनातून केली आहे.निवेदनात म्हटले आहे कीखरीप हंगाम नुकताच संपला असून, उन्हाळी हंगामाला सुरुवात झाली आहे. या हंगामात नदीच्या पाण्याचा आधार घेऊन काठावर शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांनी धान पिकाची दुहेरी लागवड केलीआहे. जवळपास १५० एकर शेतीमध्ये धानपिकाची लागवड करण्यात आली आहे. तसेच भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे. पिकांना मुबलक पाण्याची नित्यंत गरज असते. मात्रवैनगंगा नदीची पाण्याची पातळी अगदीच खालावल्यामुळे पाण्याभावी पिके मृत्यूच्या दाढेत सापडली असून, शेतकरी चिंतेत पडला आहे. चिचडोह बॅरेजच्या पाण्याच्या पातळीत वाढ करूनचिचडोह बॅरेज शेतकऱ्यांसाठी वरदान ठरावाचामोर्शी तालुका धानाचे कोठार म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात सर्वाधीक क्षेत्र भात पिकाखाली आहे. चिचडोह बॅरेज तालुक्याच्या सिंचनासाठी बांधण्यात आला आहे. शेतकऱ्यांची शेती सुजलाम् सुफलाम् व्हावी यासाठी वैनगंगा नदीवर चिचडोह बॅरेज बांधण्यात आले आहे. परंतू या बॅरेजचे पाणी मिळत नसल्याने उन्हाळी पिक धोक्यात सापडले असून शेतकरी चिंतेत पडले आहेत. याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन शेतीसाठी पाणीपुरवठा करणे गरजे आहे.नदीच्या पाण्याच्या पातळी वाढवावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी माजी सरपंच अशोक वासेकर, माजी ग्राप सदस्य पांडुरंग टिकले, अतुल भांडेकर, देवेंद्र काळे, सेवा निवृत्त मुख्याध्यापक काशिनाथ दूधबळे, घनश्याम भांडेकर, आनंदराव पिपरे, किशोर पिपरे, दशरथनैताम, यादव काळे, रवींद्र वासेकर, प्रभाकर कोठारे, रवींद्र कुनघाडकर, जिवनदास कुनघाडकर, गणपत सातपुते, वासुदेव वाघाडे, शामराव वाघाडे, रवींद्र वाघाडे, दयाळ कोठारे, आनंदराव दूधबळे, श्रीकृष्ण भांडेकर, गणेश दूधबळे, सुभाष मेश्राम, आत्माराम गव्हारे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here