जखमी युवकाची मृत्यूशी झुंज संपली !

0
31

कुरखेडा :देसाईगंजमार्गावरील नान्हीफाट्याजवळ १२फेब्रुवारीला शेतातचिखलणी करूनपरतणाऱ्याट्रॅक्टरनेमयूर घुगुसकरदुचाकीला धडक दिली होती. यातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान १५ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता नागपूर येथे खासगी दवाखान्यात मृत्यू झाला.मयूर देवराव घुगुसकर (२१, रा. गोठणगाव, ता. कुरखेडा) असे मयताचे नाव आहे. तो बोअरवेल कंपनीमध्ये काम करायचा. १२ रोजी देसाईगंजहून दुचाकीवरून कुरखेडाकडे येताना ट्रॅक्टरने त्यास धडक दिली. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचारानंतर त्यास नागपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचार सुरू असताना १५ रोजी त्याची प्राणज्योत मालवली.कुटुंबाचा आक्रोशमयूरच्या दोन बहिणी, आई-वडील असा आप्तपरिवार आहे. त्याचा मृत्यू झाल्याचे कळताच कुटुंबाने आक्रोश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here