Home
HomeBreaking Newsसामाजिक बांधिलकी जोपासणारा उपक्रम ;

सामाजिक बांधिलकी जोपासणारा उपक्रम ;

भोलूभाऊ सोमनानी मित्रपरिवार यांच्या वतीने वैरागड येथे पाणपोईचे उद्घाटन ;

आरमोरी / वैरागड :- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून वैरागड येथील इंदिरा चौक, बाजार टोली येथे भोलूभाऊ सोमनानी मित्रपरिवाराच्या वतीने पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.
आरमोरी तालुक्यातील वैरागड हे परिसरातील प्रमुख बाजारपेठ असल्यामुळे येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या पाणपोईचे उद्घाटन शितलताई सोमनानी सामाजिक कार्यकर्त्या, तथा माजी जिल्हा परिषद सदस्य केशवराव गेडाम यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच संगीताताई पेंदाम, कोजबीच्या माजी सरपंच वैशालीताई डोंगरवार, ग्रामपंचायत सदस्य आदेश आकरे, संगीताताई मेश्राम, प्रतिभाताई बनकर, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष विमलताई बारस्कर, रुचित बोधनकर, दिलीप सहारे, भोलूभाऊ सोमनानी मित्रपरिवार वैरागडचे सर्व नवतरुण कार्यकर्ते तसेच वैरागड येथील बहुसंख्य नागरिक उपस्थिती होते.
या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून, सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम म्हणून त्याचे कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे संचालन व आभार रामदास डोंगरवार यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments