Home
HomeBreaking Newsप्रशासनावर दबाव टाकून ज्येष्ठ पत्रकारच करतो रेतीची तस्करी...

प्रशासनावर दबाव टाकून ज्येष्ठ पत्रकारच करतो रेतीची तस्करी…

एटापल्ली तालुक्यातील आलदंडी नदी घाटावरून रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत अवैद्य रेतीची चोरी..

एटापल्ली :- एटापल्ली तालुक्यातील आलदंडी येथील बांदे नदी घाटावरून रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत अवैद्य रेतीची चोरी केली जात आहे.
शिक्षकी पेशेतून पत्रकारितेकडे वळलेले ज्येष्ठ पत्रकारच रेतीची तस्करी करत असल्याचे परिसरात चर्चा केली जात आहे. महसूल विभाग व वनविभाग या दोन्ही प्रकारच्या शासन-प्रशासनाला न जुनामता व शासन – प्रशासनावर दबाव टाकून एटापल्ली तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकारच रेतीची तस्करी करत असेल तर शासनाला व प्रशासनाला होणाऱ्या नुकसानीची भरपाई कोण करणार व कुठून होणार ?

“पहिले होते शिक्षकी पेशातआता झाले जेष्ठ पत्रकार”..

एटापल्ली तालुक्यातील आलदंडी येथील बांदे नदी घाटावरून खुलेआम रेतीची तस्करी होत असताना महसूल विभाग व वन विभागातील शासन- प्रशासनाचे अधिकारी मात्र झोपेचे सोंग घेऊन ज्येष्ठ पत्रकाराला खुली मुभा दिली आहे का ? असा प्रश्न सदर परिसरातील जनता जनार्दन शासन प्रशासनाला विचारत आहे. की सदर जेष्ठ पत्रकाराला शासन आणि प्रशासन सहकार्य करत आहे हेच कळेनासे झाले असून अशा अवैध धंद्यांना ज्येष्ठ पत्रकाराकडूनच नदी मधून रेती तस्करीची मुभा असेल तर करायचं काय? आणि जर दुसऱ्यांनी चोरी केलेली अवैद्य रेती पेपरला छापायचे तर कसे असाही प्रश्न ज्येष्ठ पत्रकार यांना उपस्थित होत असल्याचे दिसून येत आहे. याचाच अर्थ असा होतो आहे की, एटापल्ली तालुक्यातील सदर अवैद्य रेती तस्करांवर या ज्येष्ठ पत्रकारांचा आशीर्वाद असावा.

आलदंडी येथील बांदे नदी घाटावरून रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत जेष्ठ पत्रकार मुजोरीने, धमकावत, प्रशासनावर दबाव टाकून, सर्रास रेती तस्करी करत असल्याचे परिसरात बोलल्या जात आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी करून सदर व्यक्तीवर गुन्हे दाखल करून कारवाई करा अशी मागणी परिसरात जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments